rrp
वाद - प्रतिवाद.. उखीर - वाखिर..
झडतोय संवाद माझा माझ्याशीच!
(एकटयाने प्रवास करणे किती मजेशीर!)
rrp
व्याकूळ.. हळूवार.. भयभीत.. सैरभैर..
किती किती चेहरे माझ्या एकलेपणाचे!
(कशी असतात गं तुझ्या एकांताची रूपे?)
rrp
तुझा विरह.. नि:शब्द एकांत.. पुस्तके बंद.. टेप शांत..
जीवाची तग-मग.. खिन्न मन.. उदास नजर.. सुन्न क्षण..
.....ह्या साऱ्या-साऱ्याला उतारा आहे तूच फक्त
rrp
- संदीप मसहूर
खुपच छान !
ReplyDelete