Sunday, June 26, 2011

एकांत

rrp

वाद - प्रतिवाद.. उखीर - वाखिर..
झडतोय संवाद माझा माझ्याशीच!

(एकटयाने प्रवास करणे किती मजेशीर!)


rrp

व्याकूळ.. हळूवार.. भयभीत.. सैरभैर..
किती किती चेहरे माझ्या एकलेपणाचे!

(कशी असतात गं तुझ्या एकांताची रूपे?)


rrp

तुझा विरह.. नि:शब्द एकांत.. पुस्तके बंद.. टेप शांत..
जीवाची तग-मग.. खिन्न मन.. उदास नजर.. सुन्न क्षण..

.....ह्या साऱ्या-साऱ्याला उतारा आहे तूच फक्त


rrp

-  संदीप  मसहूर

1 comment: