Sunday, June 26, 2011

त्रिवेणी - गझल : माणसे


rrp

एकमेकांना जरी भेटती माणसे
एकटेपणाचा शाप भोगती माणसे
एक तरी मैतर शोधती माणसे


rrp

छत्री.. टोपी.. रेनकोट.. यांचा  बंदोबस्त!
पावसातही कोरडी राहती माणसे!!
ॠतूंनो, स्थितप्रज्ञ असती माणसे!!


rrp

माणसांशी नाती.. नात्यांचा गोतावळा..
गोतावळयांचा जात-धर्म करती माणसे
(-जातीने माणसांना विभागती माणसे)


rrp

कुठे जाणे-येणे नाही.., मिसळणे नाही..
खिडक्या-दारे बंद करती माणसे
चार भिंतींना विश्व समजती माणसे


rrp

संध्याकाळी भूपाळी.. सकाळी यमन!
अन् वर्ज्य सूर आळवती माणसे!!
तरीही दाद किती मिळविती माणसे!!!


rrp

जरी शब्द ऐकती.. बोलती.. वाचती 
भाव त्यांतला न समजती माणसे
काव्य उपेक्षेने कोमेजती माणसे


rrp

बोलण्याचा धंदा.. धंद्याचेच ऐकणे..
संवादाचा बाजार करिती माणसे
कॉल सेंटर : मुकी-बहिरी होती माणसे


rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment