Sunday, June 26, 2011

शब्द


rrp

गप्प गप्प असतो.. काही बोलतच नाही..
आता कागदावरच माझे शब्द उमटतात..

(..आणि तिला म्हणे वाचनाची आवडच नाही!)


rrp

नेहमीचेच बोलणे उत्कट होता शब्दांचे होई गाणे
गळयात गाणे असणे म्हणजे अजून एक भाषा येणे!

शब्द ना उमगले तरी उत्कटता जाणून घे, लाडके


rrp

मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?

(माझे शब्द, शब्दांचे अर्थ, अन् तुझी समज..
हाय, कधी जमेल मेळ? कधी कळेल तुला?..)


rrp

-  संदीप  मसहूर

2 comments: