Sunday, June 26, 2011

आजोळ

rrp


एप्रिल महिना.. परिक्षा झाली की मामाचा गाव.. मज्जा-धमाल..
आता ना परिक्षा, ना सुट्टी.. उरल्यात काही अंधुक आठवणी

तसा आता जातो मी मामाच्या गावाला गुगल-अर्थ वरून, पण..


rrp

अक्षांक्ष-रेखांक्ष.. भौगोलिक नकाशा.. सॅटेलाईट-व्हयू देखिल..
....गुगल-अर्थ वर मी शोधून काढले माझे आजोळचे गाव!

माझी नाती, आठवणीतील आजोळ यांना कसे शोधायचे तिथे?


rrp

कधी इवलासा भाग, कधी सारा परिसर.. पुन्हा पुन्हा बघत होतो
...गुगल-अर्थ वर झूम करता येत होते माझे आजोळचे गाव!

विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या बालपणाला झूम करता येईल?


rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment