Sunday, June 26, 2011

त्रिवेणी - गझल : तू पण ना!


rrp

भलते सलते विचारतोस, तू पण ना!
वर उत्तरही मागतोस, तू पण ना!
(-मग डोळयात काय वाचतोस?, तू पण ना!)

rrp

..बस पुरे कर नजरेची सैर आता
किती किती रे न्याहाळतोस; तू पण ना!
(-काय काय रे न्याहाळतोसतू पण ना!)

rrp

मनी तुझेच रूपओठी तुझेच नाव
सदा सोबतीस राहतोस, तू पण ना!
(अन् स्वप्नातही जागवतोसतू पण ना!)

rrp

तूही आठवत असशील मला सारखा
उचकी होऊन भेटतोस, तू पण ना!
(-भेटीची ओढ लावतोसतू पण ना!)

rrp

पहिला पाऊस.. बदलून गेला ॠतू
मोर होऊन नाचतोस, तू पण ना!
(रंग हिरवा अंगी बाणतोसतू पण ना!)

rrp

तुझ्या रंगात रंगल्याच्या खुणा माझ्या देहभर..
आणिक मेंदी लाव म्हणतोस, तू पण ना!
(रंगाला गंध आणतोसतू पण ना!)

rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment