Sunday, June 26, 2011

farmville-fishville


rrp


शेत राखणीला आलंय, पिकं करपतील, ट्रॅक्टर घ्यायचाय..
दूधं काढायचित, अंडी विकायचित, माश्यांना खाऊ घालायचंय..

..आणि आज नेमकं नेट-डाऊन, फार्मव्हिल्ले-फिशव्हिल्लेचं काय होणार?


rrp

फार्मव्हिल्ले अल्प भूधारक चिंताग्रस्त होतात, (इतकंच..)
नेट कनेक्ट नाही झालं तर (फक्त) जीव कासावीस  होतो..

-विदर्भातील शेतकरी म्हणे आत्महत्या(ही) करतात!


rrp

डोहाळ जेवणाला काय बरे भेट द्यावे?
फार्मव्हिल्ले-फिशव्हिल्लेची व्हर्च्यूअल गिफ्ट्स पाठवावीत का?

शाळेतली बालमैत्रिण आता असते परदेशात


rrp

मामाचा गाव, गाई-म्हशी, शेती, वेगवेगळी पिकं..
किती अप्रूप वाटायचं माझ्या शहरी बालपणाला

आता दूधाची तहान व्हर्च्युअली भागवली फार्मव्हिल्लेने!


rrp

-  संदीप  मसहूर

No comments:

Post a Comment