Sunday, August 7, 2011

FD' च्या निमित्ताने..


ओळख.. स्नेह.. आपुलकी.. sharing.. दोस्ती..
तू-मी मिळून किती टप्पे पार करीत गेलो!

आता पुढे? -अतिपरिचयात् अवज्ञा, अबोला, संशय, वैर....


- संदीप मसहूर

Sunday, June 26, 2011

त्रिवेणी - गझल : तू पण ना!


rrp

भलते सलते विचारतोस, तू पण ना!
वर उत्तरही मागतोस, तू पण ना!
(-मग डोळयात काय वाचतोस?, तू पण ना!)

rrp

..बस पुरे कर नजरेची सैर आता
किती किती रे न्याहाळतोस; तू पण ना!
(-काय काय रे न्याहाळतोसतू पण ना!)

rrp

मनी तुझेच रूपओठी तुझेच नाव
सदा सोबतीस राहतोस, तू पण ना!
(अन् स्वप्नातही जागवतोसतू पण ना!)

rrp

तूही आठवत असशील मला सारखा
उचकी होऊन भेटतोस, तू पण ना!
(-भेटीची ओढ लावतोसतू पण ना!)

rrp

पहिला पाऊस.. बदलून गेला ॠतू
मोर होऊन नाचतोस, तू पण ना!
(रंग हिरवा अंगी बाणतोसतू पण ना!)

rrp

तुझ्या रंगात रंगल्याच्या खुणा माझ्या देहभर..
आणिक मेंदी लाव म्हणतोस, तू पण ना!
(रंगाला गंध आणतोसतू पण ना!)

rrp

-  संदीप  मसहूर

त्रिवेणी


rrp

पौर्णिमेचा ठसठशीत चंद्र उदास करतो मला..
लयदार चतकोर चंद्रकोर भुलवी-झुलवी मना
(-गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा!!!)


rrp

अंधुकले होते अन् हवा होती कुंद-कुंद
पाऊस संततधार.. खिडकीपाशी मी स्तब्ध
(तुझ्या आठवणींनी ऊब दिली, ..पण गारठलोही)


rrp

सगळे मामले मनाचे जरी केले साफ मी
होई ह्या काळजाची घालमेल कधीकधी
पाषाण-हृदयी बनणे इतके कठीण का?


rrp

सांग, कोणासही का तू भावला नाही?
-हृदय जिंकणे कठीण मामला नाही
(--पण, हा तुझा ही तर मामला नाही!)


rrp

बेबंद.. बेलगाम.. स्वतंत्र.. मस्तवाल..
-कितीदा वाटते जगावे उधाणून!
(एक वळू आहे माझ्या मनात दडून!!)


rrp

आरसाच सांगू शकेल खरे काय ते-
चेहरा काय होता? कसा झालाय आता?
(पण कोणता बदल कोणामुळे?, हे कोण सांगेल?)


rrp

धका-धकी ऐवजी तबीयतीने जगायची स्वप्ने!
पण मिळे द्रुत लय, विलंबित खयाल विसरा!!
(जणू सखीने कापावेत तिचे लांब सडक केस!!!)


rrp

बनून चांदणी विरघळ माझ्यात,
थंडक पसरू दे उसळत्या रक्तात!
(-नको थोपवूस अद्वैताच्या प्रवासात)


rrp

मी
तू
आपण!


rrp

हिंदुस्तान
पाकिस्तान
बांग्लादेश!


rrp

किंचाळून केला त्यांनी आक्रस्ताळी आक्रोश
त्यांना म्हणे ब्र ही उच्चारता आला नाही
आशय काहीच मांडला नाही त्यांनी परंतु!


rrp

-  संदीप  मसहूर

रंग-बिरंगी आठवणी


आठ मार्च


rrp

मुक्त.. बंधमुक्त.. स्वतंत्र.. परी.. आणि परिपूर्ण..
आठ मार्च! आज विशेषणांनी सजेल स्त्री-शक्ती!

(असे वा तसे, बाईला सजवायलाच हवे का?)

rrp
-  संदीप  मसहूर

विचारपूस


rrp

जरी पूर्वीचाच मी अन् तोच ठाव-ठिकाणा आजही..
विचारावेस तरी तू : पत्ता काय तुझा?.. कसा आहेस?..

(बदलतील माझे ॠतू तुझ्या साध्या चौकशीनेही!)


rrp

माझ्या शहराचे हवा-पाणी कसे आहे?, प्रश्न तुझा
-कधी तर माझ्या मनाचेही ॠतू जाणून घे यार!

(बदलतील माझे मौसम तुझ्या साध्या चौकशीनेही!)


rrp

तुझ्या शहरातील आकाश विलोभनीय असेलही,
मात्र इथे माझे ग्रह-तारे आहेत झाकोळलेले!

(चलावे म्हणतोय आता एका नव्या ताऱ्याच्या शोधात!)


rrp

-  संदीप  मसहूर