ओळख.. स्नेह.. आपुलकी.. sharing.. दोस्ती..
तू-मी मिळून किती टप्पे पार करीत गेलो!
आता पुढे? -अतिपरिचयात् अवज्ञा, अबोला, संशय, वैर....
त्रिवेणी हा कवितेचा नविन आकृतिबंध फक्त तीन ओळींचा आहे. पहिल्या दोन ओळींत गजलच्या कोणत्याही एखाद्या शेराप्रमाणेच अनुभवाची पूर्ण अभिव्यक्ती होते. मात्र त्या दोन ओळींना अलगद अजून एक ओळ येऊन मिळते. ही तिसरी ओळ जरा शेंडेफळासारखी खटयाळ आहे (-पण वाह्यात मात्र नाही). तिसऱ्या ओळीच्या येण्याने आधीच्या दोन ओळींतील अर्थाला एक नविनच परिमाण मिळते. आधीचा अर्थ बदलतो किंवा त्यात अजून काही अर्थांचे पदर येऊन मिसळतात. परंतु अर्थाचा अनर्थ मात्र होत नाही. त्रिवेणीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Prologue वाचावा.