rrp
भलते सलते विचारतोस, तू पण ना!
वर उत्तरही मागतोस, तू पण ना!
(-मग डोळयात काय वाचतोस?, तू पण ना!)
rrp
..बस पुरे कर नजरेची सैर आता
किती किती रे न्याहाळतोस; तू पण ना!
(-काय काय रे न्याहाळतोस; तू पण ना!)
rrp
मनी तुझेच रूप, ओठी तुझेच नाव
सदा सोबतीस राहतोस, तू पण ना!
(अन् स्वप्नातही जागवतोस, तू पण ना!)
rrp
तूही आठवत असशील मला सारखा
उचकी होऊन भेटतोस, तू पण ना!
(-भेटीची ओढ लावतोस, तू पण ना!)
rrp
पहिला पाऊस.. बदलून गेला ॠतू
मोर होऊन नाचतोस, तू पण ना!
(रंग हिरवा अंगी बाणतोस, तू पण ना!)
rrp
तुझ्या रंगात रंगल्याच्या खुणा माझ्या देहभर..
आणिक मेंदी लाव म्हणतोस, तू पण ना!
(रंगाला गंध आणतोस, तू पण ना!)
rrp
- संदीप मसहूर